सत्कृत्य Good Turn (दररोज एक)
दररोज एक तरी सत्कृत्य करणे व दैनंदिनी लिहिणे
स्काऊट-गाईड शिक्षण समाजाभिमुख आहे. समाजाकडून आपण कांही चांगले शिकत असतो तर काही वेळा समाजाला आपली गरज असते. ही गरज समाजसेवा या रूपाने आपण पूर्ण करतो. " सेवेचे शिक्षण" म्हणजे केवळ तत्वे शिकविणे असे नाही तर इतराविषयी सदिच्छा बाळगण्याची वृत्ती निर्माण करणे व प्रत्यक्षात त्यांचा अविष्कार होय. हा अविष्कार म्हणजे सत्कृत्य.
सत्कृत्य म्हणजे चांगले काम. विना मोबदला सेवा स्वरूपात केलेले काम म्हणजे सत्कृत्य. स्काऊट-गाईड म्हणून तुम्हाला रोज निदान एक तरी सत्कृत्य करावे लागेल. हे काम तुम्ही निरपेक्ष वृत्तीने केले पाहिजे. सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात एक तरी सत्कृत्य करावयाचे आहे याची आठवण ठेवावी. एखाद्या दिवशी सत्कृत्य
करावयाचे राहून गेले तर दुसऱ्या दिवशी दोन करावीत. मात्र एका दिवशी असे बंधन नाही. त्यापेक्षा अधिक कामे केली तर ' अधिकश्य अधिकम् फलम्।
सत्कृत्य म्हणजे फार मोठे धाडसाचे काम नाही. तर अगदी साध्ये काम सुद्धा सत्कृत्य होईल.
उदा. लहान मुले, आंधळे - अपंग म्हातारे यांना मदत करणे.
बस मध्ये आवश्यक त्यांना बसावयास जागा देणे.
तहानलेल्याला पाणी देणे.
रस्त्यात पडलेला दगड उचलणे.
कचरा कुंडीत टाकणे.
इत्यादी.