स्काऊट प्रार्थना
दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,
दया करना हमारी
आत्मा में शुद्धता देना .
हमारे ध्यान में
आओ ,प्रभु आँखों में बस जाओ,
अँधेरे दिल में
आकर के ,परम ज्योति जगा देना.
बहा दो प्रेम की
गंगा,दिलो में प्रेम का सागर,
हमे आपस में
मिलजुलकर प्रभु रहना सिखा देना.
हमारा कर्म हो
सेवा,हमारा धर्म हो सेवा,
सदा ईमान हो
सेवा व सेवकचर बना देना.
वतन के वास्ते
जीना,वतन के वास्ते मरना,
वतन पर जां
फ़िदा करना प्रभु हमको सिखा देना.
दया कर दान
भक्ति का हमें परमात्मा देना,
दया करना हमारी
आत्मा में शुद्धता देना.
प्रार्थनेचा
अर्थ
हे परमेश्वरा दया करून भक्तीचे दान आम्हाला
दे, कृपा करून
आमच्या अंत:करणामध्ये शुद्धता दे
हे परमेश्वरा आमच्या सदैव स्मरणात ये आणि
नजरेत बस. अंधकारमय अंत:करणामध्ये ज्ञानरूपी दिव्य ज्योती सदैव तेवत ठेव, जागा
कर.
हे परमेश्वरा आमच्या अंत:करणात सदैव
प्रेमरूपी गंगा व दयेचा सागर वाहावयास लाव. आम्हाला परस्पर मिळून-मिसळून राहावयास
शिकव.
सेवा हेच आमचे काम असू दे आणि सेवा हाच धर्म
असू दे. सदैव प्रामाणीकपणे सेवा करणारा सेवक तू मला बनव.
हे परमेश्वरा देशासाठी
जगणे आणि देशासाठी मरणे, देशासाठी प्राणार्पण करायला आम्हाला शिकव.
हे परमेश्वरा कृपा करून, दयाळू
होऊन भक्तीचे दान तू आम्हाला दे आणि कृपा करून आमच्या अंत:करणास शुद्धता दे.
झंडा
गीत
भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा,
ऊँचा
सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
नीला
रंग गगन सा विस्तृत भात्र भाव फैलाता,
त्रिदल
कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता.
और
चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढेगा,
ऊँचा
सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. || १ ||
ये चौबीसो आरे चक्र के हमसे प्रतिपल कहते
सावधान चौबीसो घंटे, हममें है बल भरते
तत्पर सदा रहे सेवामें जीवन सफल बनेगा
ऊँचा
सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. || २ ||
परहित रक्षामें हम जीवन, हँस हँस दे दे अपना
इस झंडेपर मरमिटनेका है सुखदायी सपना
सेवा का पथदर्शक झंडा घरघरमें फहरेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. || ३ ||
भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा.
झंडा गीताचा अर्थ
भारत स्काऊटस आणि गाईड्स संस्थेचा हा ध्वज
सदैव उंच फडकत राहील. या विशाल आकाशाप्रमाणे असलेला निळा रंग विशाल भातृभाव
पसरवितो. या ध्व्जाकारीता त्रिदल कमल सदैव प्रतिज्ञेतील ३ भागाची आठवण करून देते.
ध्वजावरील चक्र सांगत आहे की आपले पाउल प्रतिक्षण पुढेच पडेल. असा हा ध्वज सदैव
उंच फडकत राहील.
या ध्वजावरील चक्राचे २४ आरे आपणास
क्षणोक्षणी सांगत आहेत की २४ तास सदैव जागृत रहा. ते चक्र आपणामध्ये सावधानतेची जणू
शक्ती भरत आहे. आणि सांगत आहे कि जर तुम्ही नेहमी सेवेत तत्पर राहीलात तर तुमचे
जीवन सफल बनेल. असा हा ध्वज नेहमी उंच फडकत राहील.
इतरांच्या कल्याणासाठी आपणास आपले जीवन हसत
हसत घालविले पाहिजे या झेंड्याच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी आपण आपले जीवन
समर्पित करावयास तयार असले पाहिजे. सवेचा मार्गदर्शक असा हा झंडा घरोघरी फडकत
राहील.
भारताचा हा स्काऊट-गाईड ध्वज सदैव उंच फडकत
राहील.