भारतात स्काऊटींग / गाईडिंग ची सुरुवात
१९१० :- कॅप्टन टी. टोड यांनी खडकी पुणे,मेजर
डब्ल्यू.पी. पैकनहम वाल्स यांनी जबलपूर येथे स्काऊट दल सुरू केले. कर्नल जे. एस.
विल्सन आणि सर एल्फेड पिकफोर्ड यांनी कलकत्ता येथे स्काऊट ची सुरुवात केली.
१९१३ :- विवियन बोस यांनी भारतीय मुलांसाठी मध्य भारतात स्काऊटींग ची सुरुवात केली.
१९१५ :- डॉ.एनी बेसेन्ट तसेच जी.एस. अरुणधडे यांनी मद्रास येथे "इंडियन बॉय स्काऊट असोसिएशन" ची स्थापना केली बंगालमध्ये भारतीय मुलांसाठी स्काऊटींग सुरू केले.
१९१८ :- पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सूचनेवरून पंडित श्रीराम वाजपेयी यांनी पंडित हृदयनाथ कुंजरू
यांच्या सहयोगाने इलाहाबाद येथे "बालचर सेवा समिती" चा श्रीगणेशा केला.
१९१९ :- १ डिसेंबर १९१९ "सेवा समिती स्काऊट असोसिएशन" ची स्थापना इलाहाबाद मध्ये केली ज्याचे संरक्षक उत्तर प्रदेशचे गव्हर्नर यांना बनवले गेले
१९२१ :- बी. पी. यांची भारतात पहिली भेट बी.पी. भारतात जिथे-जिथे गेले तिथे रॅली काढली गेली.
इलाहाबाद, जबलपूर,
लखनऊ, रांची, मद्रास
येथे रॅली काढली गेली "दक्षिण भारतीय स्काऊट संघटन" आणि "इंडियन
बॉय स्काऊट असोसिएशन" चे एकत्रीकरण केले गेले मात्र सेवा समिती स्काऊट
असोसिएशन हे वेगळे राहिले
१९३७ :- पहिली अखिल भारतीय स्काऊट जांबुरी दिल्ली येथे आयोजित केली गेली त्यात बी.पी. नां आमंत्रित
केले गेले.
१९३८ :- एकत्रीकरणाचा पुन्हा प्रयत्न केला गेला "बाय स्काऊट असोसिएशन" चे उर्वरित संघटन एकत्र झाले त्याचे नवे नाव "द हिंदुस्तान स्काऊट असोसिएशन" झाले.
१९४७ :- स्काऊट आणि गाईड संघटनेला एकत्र करण्याचा प्रयत्न झाला.
१९४९ :- ९ मे रोजी राष्ट्रपती भवनात सभा झाली त्या सभेमध्ये भारत स्काऊट्स आणि गाईड्स ध्वज स्वीकृत
केला गेला.
१९५० :- "बॉय स्काऊट्स असोसिएशन इंडिया", "द हिंदुस्तान स्काऊट असोसिएशन" तसेच इतर असोसिएशनचे नवे नाव ७
नोव्हेंबर १९५० रोजी "भारत स्काऊट्स आणि गाईड्स" असे ठेवले गेले.
१९५१ :- १५ ऑगस्ट १९५१ रोजी "गर्ल्स गाईड असोसिएशनचे" पूर्णपणे विलीनीकरण केले गेले भारतात एक मात्र अधिकृत संघटन "भारत स्काऊट्स आणि गाईड्स" कार्यरत झाले.
त्याचे राष्ट्रीय कार्यालय
लक्ष्मी मुजुमदार भवन,१६ महात्मा गांधी मार्ग इंद्रप्रस्थ एस्टेट नवी दिल्ली-
११०००२ येथे आहे.