शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

flag ध्वज

 ध्वज ( flag )

राष्ट्रध्वज, भारत स्काऊट गाईड ध्वज, जागतिक स्काऊट ध्वज

राष्ट्रध्वज




            १५ ऑगस्ट १९४७ हा आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस या दिवशी स्वतंत्र भारताचा ध्वज अभिमानाने उभारला गेला. राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राच्या सत्तेचे, पावित्र्याचे व वैभवाचे द्योतक म्हणून सदैव डौलाने अभिमानाने फडकत राहील याबद्दल सर्वांनी सदैव जागरूक राहिले पाहिजे.

आकार :- 

        राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे ३:२ हे आहे. ध्वजातील तीन आडवे पट्टे सारख्या लांबीचे व रुंदीचे आहेत २४ आरे असलेले अशोक चक्र मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर असून त्याचा व्यास पांढऱ्या पट्ट्याच्या रुंदी एवढा असतो.

रचना :- 

        तीन आडवे रंगीत पट्टे मिळून राष्ट्रध्वज होतो. वरचा पट्टा केसरी रंगाचा मधला पांढऱ्या रंगाचा त्यावर अशोक चक्र व खालचा हिरव्या रंगाचा आहे. केसरी रंग त्याग, निष्ठा, भक्ती या गुणांचे प्रतीक आहे. पांढरा रंग पवित्र, चारित्र व उज्वलता या गुणांचे द्योतक आहे. अशोक चक्र हे प्रगती, समता, न्याय, शांती व अहिंसा यांचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. देश सुजलाम सुफलाम रहावा अशी आठवण हा रंग देतो. ध्वजाचे तीनही पट्टे सारख्या आकाराच्या असतात

        अशोक हा भारतामध्ये एक मोठा पराक्रमी राजा होऊन गेला त्याने सर्वांचे प्रेम संपादन केले होते. आपण २४ तास सावधानतेने व उत्साहाने काम करावे व प्रगती करावी असे हे २४ आ-यांचे अशोकचक्र दर्शविते. परिघावरील निरनिराळ्या बिंदूतून निघणारे हे २४ आरे एकत्र मध्यबिंदू मिळतात ते आपण सर्व एक आहोत असे दर्शवितात चक्र म्हणजे गती, प्रगती आणि हे पांढऱ्या पट्ट्या वरच असल्याचे कारण आपल्याला शांततेने प्रगती करायची आहे. म्हणजेच आम्ही जगणार व दुसऱ्यांना जगू देणार.


राष्ट्रध्वजा विषयी माहिती
        विविध प्रसंगी निरनिराळ्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारतात. राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पद्धत कोणती या विषयी संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे या बाबतीत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी ध्वज संहितेत एकत्र केलेले आहेत.

भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा ध्वज

  
            ७ नोव्हेंबर १९५० ला भारत स्काऊट आणि गाईड संस्थेची स्थापना झाली भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा ध्वज उभारण्यात आला. वचन विधी झालेल्या व भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा सभासद असलेल्या कोणत्याही गणवेशधारी व्यक्तीस भारत स्काऊट गाईड ध्वज फडकविता येतो. पाहुण्यांनी हा ध्वज फडकविण्याची पद्धत नाही.

आकार :- ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण ३:२ असे आहे जेव्हा ध्वजाची लांबी ६ व रुंदी ४ असते तेव्हा त्यावरील भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या चिन्हाची उंची व रुंदी १|| व १ असते.

रचना :- 
        गडद निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी पिवळ्या रंगांमध्ये भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे चिन्ह असते. निळा रंग सेवेचा निदर्शक आहे आकाश व पाणी यांच्या निळ्या रंगात विशालता व समानता दर्शविली जाते. आकाश पाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता व भेदाभेद न करता सतत सर्वांच्या उपयोगी पडत असतात पिवळ्या चिन्हातील बाहेरील टोकदार तीन पाकळ्या स्काऊट गाईडच्या वचनाच्या तीन भागांचे प्रतीक आहेजागतिक स्काऊट विभागाचे निदर्शक आहेत व आतील तीन पाकळ्या या जागतिक गाईड विभागाच्या निदर्शक आहेत मध्यभागी असलेले अशोक चक्र हे भारताचे प्रतीक आहे खालील तीन पाकळ्या तील आडवा पट्टा एकता दर्शवितो स्काऊट व गाईड मेळाव्याच्या वेळी, स्काऊट गाईड संस्थेच्या इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी हा ध्वज उभारता येतो.


जागतिक स्काऊट ध्वज




        जागतिक स्काऊट ध्वज हा १८ वे स्काऊट संमेलन १९६१ मध्ये लिस्बन येथे स्वीकारला गेला. जागतिक स्काऊट ध्वजात जांभळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी पांढ-या रंगाचे व पांढऱ्या दोरीने वेढलेले विश्व स्काऊट चिन्ह असते. दोरीची दोन्ही टोके खाली सुकर गाठीने एकमेकात अडकवलेली असतात. या ध्वजाचे प्रमाण भारत स्काऊट आणि गाईड ध्वजाच्या प्रमाणासारखे असते. राष्ट्रीय मेळाव्यात अगर शिबिरात परदेशी स्काऊट गाईड उपस्थित असतात तेथे हा ध्वज उभारला जातो. जागतिक मेळाव्यात, जागतिक कार्यालयावर हा ध्वज उभारला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्याला काही शंका असतील किंवा काही सूचना व काही सुचवायचे असल्यास comments मध्ये कळवा