मंगळवार, ९ मे, २०२३

संघ, संघध्वज, संघ आरोळी, संघगीत, संघ कोपरा

 संघ, संघध्वज, संघ आरोळी, संघगीत, संघ कोपरा

संघ :-

        स्काऊट-गाईड शिक्षण हा एक खेळ आहे. हा खेळ खेळण्याची एकमेव पध्दती संघ पध्दती हीच आहे. स्काऊट-गाईडचे वय हे सुध्दा संघ प्रवृत्तीचे असते. समवयस्क / समस्वभाव असलेली मुले-मुली एकत्रीत जमून खेळताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर संघपध्दती या खेळात आलेली आहे. स्काऊट-गाईडमध्ये ६ ते ८ मुले/मुली यांचा एक गट असे कायम स्वरुपी गट करण्यास उत्तेजन दिले जाते या गटाला संघ असे म्हणतात. या संघाना स्काऊट विभागात पशू-पक्षांची व गाईड विभागात फुले अथवा नक्षत्राची नांवे दिली जातात. प्रत्येक संघ त्या नांवाने ओळखला जातो.

           प्रत्येक संघाचा एक नेता असतो त्यास संघनायक / संघनायीका म्हणतात. त्यांना सहाय्यक म्हणून एक सहाय्यक संघनायक / सहाय्यक संघनायीका असते. नेतृत्वाचे ज्ञान प्रत्येक संघनायक / संघनायकेस मिळत असते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ काम करतो. मी व माझा संघ अशी आपुलकीची भावना निर्माण होते. संघनायक/संघनायीका ही चतुर, हुशार असल्यास त्या संघाचा दर्जा ही चांगला राहतो. प्रत्येक संघनायक आपल्या संघाच्या कार्यक्षमतेबद्दल व तत्परतेबद्दल जबाबदार असतात. गाईड कंपनी व गाईड कॅप्टन तसेच स्काऊट टूप व स्काऊट मास्तर यांच्या मधील संघनायक हा एक दुवा असतो.

            खऱ्याखुऱ्या नेतृत्वाचा व जबाबदारीचा संघनायक व संघनायीका यांना आपल्या संघासाठी आपुलकी आणि अत्मियतीने स्पर्धात्मक दृष्टीने कार्य करताना अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येक सभासदाला आपला संघ, संघाचे हित, संघाचे वैशिष्ट्य उत्तम राखण्याची जबाबदारी माझी ही आहे याची जाणीव होते. आपल्या संघाचा दर्जा टिकविणे व संघातील दिर्घ बुद्धीची व्यक्ती मंद बुद्धीच्या व्यक्तिचा परीश्रमाने तयारी करून सर्वांच्या बरोबर आणते. संघ म्हणजे एक कुटुंबच अशी आत्मियतेची भावना एकमेकांना समजून घेवून एकत्र कार्य केल्याने निर्माण होते. स्काऊट गाईड या खेळातील महत्वाचा दुवा संघनायक / संघनायीका हा आहे. संघाची पूर्ण जबाबदारी अंगावर घेवून कसे काम करावे यांचे मार्गदर्शन स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन करीत असतात.

        शिक्षणातील कौशल्ये प्रथम संघनायक / संघनायीका यांना शिकविली जातात. व ते संघाला शिकवितात. "दिल्याने वाढतेरे ऐसे एकची धन तेचि विद्याधन" या उक्तीनुसार हे कार्य चालते.


संघ सभा :-
        संघातील सर्व सभासद एकत्र येऊन कांही विचार विनिमय करतात, संघाचा कार्यक्रम ठरवितात. सन्मान सभेकडे पाठविण्याच्या सूचनांचा विचारविनिमय करतात. या सभेस संघातील सर्व सभासद उपस्थित असतात. या सभेला संघसभा म्हणतात. ही सभा आठवड्यातून एकदा होते.

संघ ध्वज :-
        

            प्रत्येक संघाला त्यांचा स्वतः चा ध्वज असतो. त्याचा रंग पांढरा असतो. हा ध्वज त्रिकोणी असून त्या त्रिकोणाचा पाया २० सें. मी. व दोन्ही बाजू ३० सें. मी. असते. त्यावर त्यांच्या संघाचे लाल रंगाचे चित्र असते.

संघ आरोळी :-
            ध्वजारोहणानंतर स्काऊट-गाईडना स्फुर्ती येण्यासाठी व आनंद व्यक्त करण्यासाठी आरोळी दिली जाते. प्रत्येक संघातून त्या त्या संघाचे नांव घेऊन ही आरोळी दिली जाते. ही आरोळी देणारी व्यक्ति चपळ असावी. तीच्या आरोळी देण्याच्या पध्दतीने इतरांनाही उत्साह निर्माण होतो.
उदा : गुलाब संघ
१ गुलाब है फुलोंका राजा सुगंध सुहाना ताजा ताजा अथवा :-
२ कमळ कमळ सदा निर्मळ

संघ गीत :-
प्रत्येक संघाचे वैशिष्ठ दर्शविणारे एक गीत असते. त्याला संघ गीत म्हणतात.
उदा : गुलाब संघ
हम सब गुलाब की कलियाँ है,
हम सब खुशियोंकी डालियाँ है ।
भोले बचपन की सखियाँ है,
हम सब गुलाबकी कलियाँ है ॥


संघ कोपरा :-

        संघात कौशल्यांचा सराव करण्यासाठी अथवा संघ स्पर्धेच्या वेळी प्रत्येक संघ आपल्या निश्चित केलेल्या जागी कार्यक्रमाचा सराव करतो, त्या ठिकाणास संघ कोपरा असे म्हणतात. संघ कोपऱ्यामध्ये सर्व संघ सदस्य एकत्र बसून संघनायक /संघनायकेच्या मार्गदर्शनाखाली संघ कार्याच्या पद्धतीचा आढावा घेतात या संघ कोपऱ्यात बसून संघाची वैशिष्ठ्ये संपादन करण्याची ऐक्यांची सहकार्याची भावना निर्माण होते. संघ म्हणजे एक कुटुंब इतकी जवळीक निर्माण करणारा आपपर भाव विसरविण्यास लावणारा हा कोपरा म्हणजे संघ कोपरा होय.


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

Scout Prayer/flag song Meening प्रार्थनेचा अर्थ /झंडा गीताचा अर्थ

स्काऊट प्रार्थना 

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना .

हमारे ध्यान में आओ ,प्रभु आँखों में बस जाओ,

अँधेरे दिल में आकर के ,परम ज्योति जगा देना.

बहा दो प्रेम की गंगा,दिलो में प्रेम का सागर,

हमे आपस में मिलजुलकर प्रभु रहना सिखा देना.

हमारा कर्म हो सेवा,हमारा धर्म हो सेवा,

सदा ईमान हो सेवा व सेवकचर बना देना.

वतन के वास्ते जीना,वतन के वास्ते मरना,

वतन पर जां फ़िदा करना प्रभु हमको सिखा देना.

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना.

 

प्रार्थनेचा अर्थ

हे परमेश्वरा दया करून भक्तीचे दान आम्हाला दे, कृपा करून आमच्या अंत:करणामध्ये शुद्धता दे

हे परमेश्वरा आमच्या सदैव स्मरणात ये आणि नजरेत बस. अंधकारमय अंत:करणामध्ये ज्ञानरूपी दिव्य ज्योती सदैव तेवत ठेव, जागा कर.

हे परमेश्वरा आमच्या अंत:करणात सदैव प्रेमरूपी गंगा व दयेचा सागर वाहावयास लाव. आम्हाला परस्पर मिळून-मिसळून राहावयास शिकव.

सेवा हेच आमचे काम असू दे आणि सेवा हाच धर्म असू दे. सदैव प्रामाणीकपणे सेवा करणारा सेवक तू मला बनव.

 हे परमेश्वरा देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे, देशासाठी प्राणार्पण करायला आम्हाला शिकव.

हे परमेश्वरा कृपा करून, दयाळू होऊन भक्तीचे दान तू आम्हाला दे आणि कृपा करून आमच्या अंत:करणास शुद्धता दे.

झंडा गीत

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
नीला रंग गगन सा विस्तृत भात्र भाव फैलाता,
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता.
और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. ||  ||


ये चौबीसो आरे चक्र के हमसे प्रतिपल कहते
सावधान
 चौबीसो घंटेहममें  है बल भरते
तत्पर सदा रहे सेवामें जीवन सफल बनेगा
 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. ||  ||

परहित रक्षामें हम जीवनहँस हँस दे दे अपना
इस झंडेपर मरमिटनेका है सुखदायी सपना
सेवा का पथदर्शक झंडा घरघरमें फहरेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
 ||  ||

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा.

झंडा गीताचा अर्थ

भारत स्काऊटस आणि गाईड्स संस्थेचा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील. या विशाल आकाशाप्रमाणे असलेला निळा रंग विशाल भातृभाव पसरवितो. या ध्व्जाकारीता त्रिदल कमल सदैव प्रतिज्ञेतील ३ भागाची आठवण करून देते. ध्वजावरील चक्र सांगत आहे की आपले पाउल प्रतिक्षण पुढेच पडेल. असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील.

या ध्वजावरील चक्राचे २४ आरे आपणास क्षणोक्षणी  सांगत आहेत की २४ तास सदैव जागृत रहा. ते चक्र आपणामध्ये सावधानतेची जणू शक्ती भरत आहे. आणि सांगत आहे कि जर तुम्ही नेहमी सेवेत तत्पर राहीलात तर तुमचे जीवन सफल बनेल. असा हा ध्वज नेहमी उंच फडकत राहील.

इतरांच्या कल्याणासाठी आपणास आपले जीवन हसत हसत घालविले पाहिजे या झेंड्याच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी आपण आपले जीवन समर्पित करावयास तयार असले पाहिजे. सवेचा मार्गदर्शक असा हा झंडा घरोघरी फडकत राहील.

भारताचा हा स्काऊट-गाईड ध्वज सदैव उंच फडकत राहील. 

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

Scout Flag Process

स्काऊट ध्वजारोहण पद्धत



    सर्वप्रथम ध्वजस्तंभावर ध्वज व्यवस्थित घडी करून ध्वज बांधून ठेवावा सर्व स्काऊट मैदानावर आल्यावर ध्वजस्तंभा पुढे संघा प्रमाणे सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती उभे करतात.

x

    संघनायक संघाच्या उजव्याबाजूस प्रथमउपसंघनायक संघाच्या डाव्या बाजूस शेवटी उभा राहतो.

ध्वजनेता ( ध्वजलीडर ) नालाकृतीवर डाव्या बाजूस पहिल्या जागेवर उभा राहतो.

    सहाय्यक स्काऊट मास्टर ध्वज स्तंभाच्या समोर पुढे २ पावलावर उभा राहतो सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती (हॉर्शु) व्यवस्थित करून घेतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- दल/ट्रूप/संघ विश्राम - सावधान

डाव्या बाजूला एक पाउल बाजूला घेऊन पीछे मूड करतो व ३ पाऊल पुढे जाऊन पीछे मूड करतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- विश्राम - सावधान

सहाय्यक स्काऊट मास्टर पीछे मूड करतो व स्काऊट मास्टर यांना सॅल्युट करतो व स्काऊट मास्टर ही त्यांना सॅल्यूट करतात नंतर सहाय्यक स्काऊट मास्टर उजवीकडे एक पाऊल जाऊन सरळ पुढे पावले जाऊन पीछे मूड करून ओळीवर जाऊन उभे राहतील, त्याच वेळी स्काऊट मास्टर पावले सरळ पुढे जाऊन स्वतःची जागा घेतात

स्काऊट मास्टर ऑर्डर देतो.

- विश्राम - सावधान

- प्रार्थना सुरू

- विश्राम - सावधान

- ध्वजनेता ( ध्वजलीडर )चल दो

यावेळी ध्वजनेता ध्वज स्तंभाकडे सरळ मार्चिंग करत येईल दाहीने मूड करून एक पाऊल ध्वज स्तंभाकडे पुढे जाईल व उजवा हात ऊंच करून ध्वज दोरी ( हेलियार्ड ) हातात धरेल त्याच वेळी

स्का. मा. ऑर्डर देतो

- सॅल्यूट

सॅल्यूट ऑर्डर मिळाल्यावर ध्वज नेता ध्वज दोरी खेचले ध्वज फडकविला जाईल त्याच वेळी सर्वांनी ध्वजाला सॅल्यूट करावे. ध्वज नेता ध्वज दोरीचा क्लिटला एक वळसा देऊन एक पाऊल मागे येऊन ध्वजाला सॅल्यूट करेल.

स्का. मा. ऑर्डर देतो

- हाथ नीचे

- झंडा गीत सुरू

झंडा गीत संपल्यावर ध्वजनेता दाहीने मूड करून मार्चिंग करत आपल्या जागेवर जाऊन पिछे मूड करून आपल्या मूळ स्थितीत उभा राहतो.

स्का. मा. ऑर्डर देतो

- विश्राम

पुढील सूचना देण्यात येतील

- सावधान

- स्वस्थान.