शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

Scout Prayer/flag song Meening प्रार्थनेचा अर्थ /झंडा गीताचा अर्थ

स्काऊट प्रार्थना 

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना .

हमारे ध्यान में आओ ,प्रभु आँखों में बस जाओ,

अँधेरे दिल में आकर के ,परम ज्योति जगा देना.

बहा दो प्रेम की गंगा,दिलो में प्रेम का सागर,

हमे आपस में मिलजुलकर प्रभु रहना सिखा देना.

हमारा कर्म हो सेवा,हमारा धर्म हो सेवा,

सदा ईमान हो सेवा व सेवकचर बना देना.

वतन के वास्ते जीना,वतन के वास्ते मरना,

वतन पर जां फ़िदा करना प्रभु हमको सिखा देना.

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना.

 

प्रार्थनेचा अर्थ

हे परमेश्वरा दया करून भक्तीचे दान आम्हाला दे, कृपा करून आमच्या अंत:करणामध्ये शुद्धता दे

हे परमेश्वरा आमच्या सदैव स्मरणात ये आणि नजरेत बस. अंधकारमय अंत:करणामध्ये ज्ञानरूपी दिव्य ज्योती सदैव तेवत ठेव, जागा कर.

हे परमेश्वरा आमच्या अंत:करणात सदैव प्रेमरूपी गंगा व दयेचा सागर वाहावयास लाव. आम्हाला परस्पर मिळून-मिसळून राहावयास शिकव.

सेवा हेच आमचे काम असू दे आणि सेवा हाच धर्म असू दे. सदैव प्रामाणीकपणे सेवा करणारा सेवक तू मला बनव.

 हे परमेश्वरा देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे, देशासाठी प्राणार्पण करायला आम्हाला शिकव.

हे परमेश्वरा कृपा करून, दयाळू होऊन भक्तीचे दान तू आम्हाला दे आणि कृपा करून आमच्या अंत:करणास शुद्धता दे.

झंडा गीत

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
नीला रंग गगन सा विस्तृत भात्र भाव फैलाता,
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता.
और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. ||  ||


ये चौबीसो आरे चक्र के हमसे प्रतिपल कहते
सावधान
 चौबीसो घंटेहममें  है बल भरते
तत्पर सदा रहे सेवामें जीवन सफल बनेगा
 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. ||  ||

परहित रक्षामें हम जीवनहँस हँस दे दे अपना
इस झंडेपर मरमिटनेका है सुखदायी सपना
सेवा का पथदर्शक झंडा घरघरमें फहरेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
 ||  ||

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा.

झंडा गीताचा अर्थ

भारत स्काऊटस आणि गाईड्स संस्थेचा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील. या विशाल आकाशाप्रमाणे असलेला निळा रंग विशाल भातृभाव पसरवितो. या ध्व्जाकारीता त्रिदल कमल सदैव प्रतिज्ञेतील ३ भागाची आठवण करून देते. ध्वजावरील चक्र सांगत आहे की आपले पाउल प्रतिक्षण पुढेच पडेल. असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील.

या ध्वजावरील चक्राचे २४ आरे आपणास क्षणोक्षणी  सांगत आहेत की २४ तास सदैव जागृत रहा. ते चक्र आपणामध्ये सावधानतेची जणू शक्ती भरत आहे. आणि सांगत आहे कि जर तुम्ही नेहमी सेवेत तत्पर राहीलात तर तुमचे जीवन सफल बनेल. असा हा ध्वज नेहमी उंच फडकत राहील.

इतरांच्या कल्याणासाठी आपणास आपले जीवन हसत हसत घालविले पाहिजे या झेंड्याच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी आपण आपले जीवन समर्पित करावयास तयार असले पाहिजे. सवेचा मार्गदर्शक असा हा झंडा घरोघरी फडकत राहील.

भारताचा हा स्काऊट-गाईड ध्वज सदैव उंच फडकत राहील. 

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

Scout Flag Process

स्काऊट ध्वजारोहण पद्धत



    सर्वप्रथम ध्वजस्तंभावर ध्वज व्यवस्थित घडी करून ध्वज बांधून ठेवावा सर्व स्काऊट मैदानावर आल्यावर ध्वजस्तंभा पुढे संघा प्रमाणे सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती उभे करतात.

x

    संघनायक संघाच्या उजव्याबाजूस प्रथमउपसंघनायक संघाच्या डाव्या बाजूस शेवटी उभा राहतो.

ध्वजनेता ( ध्वजलीडर ) नालाकृतीवर डाव्या बाजूस पहिल्या जागेवर उभा राहतो.

    सहाय्यक स्काऊट मास्टर ध्वज स्तंभाच्या समोर पुढे २ पावलावर उभा राहतो सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती (हॉर्शु) व्यवस्थित करून घेतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- दल/ट्रूप/संघ विश्राम - सावधान

डाव्या बाजूला एक पाउल बाजूला घेऊन पीछे मूड करतो व ३ पाऊल पुढे जाऊन पीछे मूड करतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- विश्राम - सावधान

सहाय्यक स्काऊट मास्टर पीछे मूड करतो व स्काऊट मास्टर यांना सॅल्युट करतो व स्काऊट मास्टर ही त्यांना सॅल्यूट करतात नंतर सहाय्यक स्काऊट मास्टर उजवीकडे एक पाऊल जाऊन सरळ पुढे पावले जाऊन पीछे मूड करून ओळीवर जाऊन उभे राहतील, त्याच वेळी स्काऊट मास्टर पावले सरळ पुढे जाऊन स्वतःची जागा घेतात

स्काऊट मास्टर ऑर्डर देतो.

- विश्राम - सावधान

- प्रार्थना सुरू

- विश्राम - सावधान

- ध्वजनेता ( ध्वजलीडर )चल दो

यावेळी ध्वजनेता ध्वज स्तंभाकडे सरळ मार्चिंग करत येईल दाहीने मूड करून एक पाऊल ध्वज स्तंभाकडे पुढे जाईल व उजवा हात ऊंच करून ध्वज दोरी ( हेलियार्ड ) हातात धरेल त्याच वेळी

स्का. मा. ऑर्डर देतो

- सॅल्यूट

सॅल्यूट ऑर्डर मिळाल्यावर ध्वज नेता ध्वज दोरी खेचले ध्वज फडकविला जाईल त्याच वेळी सर्वांनी ध्वजाला सॅल्यूट करावे. ध्वज नेता ध्वज दोरीचा क्लिटला एक वळसा देऊन एक पाऊल मागे येऊन ध्वजाला सॅल्यूट करेल.

स्का. मा. ऑर्डर देतो

- हाथ नीचे

- झंडा गीत सुरू

झंडा गीत संपल्यावर ध्वजनेता दाहीने मूड करून मार्चिंग करत आपल्या जागेवर जाऊन पिछे मूड करून आपल्या मूळ स्थितीत उभा राहतो.

स्का. मा. ऑर्डर देतो

- विश्राम

पुढील सूचना देण्यात येतील

- सावधान

- स्वस्थान.

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

भारतात स्काऊटींग / गाईडिंग ची सुरुवात

भारतात स्काऊटींग / गाईडिंग ची सुरुवात

               भारतात इंग्रजांची सत्ता असल्यामुळे जेव्हा जेव्हा इंग्लंडमध्ये स्काऊटींग चा प्रसार होत गेला तेव्हा भारतात पण अँग्लो-इंडियन मुलांसाठी स्काऊटींग सुरू केले गेले. १९०९ मध्ये कॅप्टन टी. एच. बेकर यांनी बॉय स्काऊट असोसिएशन ची स्थापना करून बेंगलोर येथे पहिले स्काऊट युनिट सुरू केले. १९१० मध्ये कॅप्टन टी. टोड, मेजर डब्ल्यू. पी. पैकनहम, कर्नल जे. एस. विल्सन, सर एल्फेड पिकफोर्ड यांनी पुणे,जबलपूर, कलकत्ता इत्यादी ठिकाणी स्काऊटींग सुरू केली. १९१३ मध्ये विवियन बोस यांनी मध्य भारतात स्काऊटींग ची सुरुवात केली. १९१५ मध्ये डॉ.एनीबेसेन्ट तसेच जी. एस. अरुणधडे यांनी मद्रास येथे " इंडियन बॉय स्काऊट असोसिएशनची" स्थापना करून स्काऊट दल सुरू केले. १९१८ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सूचनेवरून पंडित श्रीराम वाजपेयी यांनी पंडित हृदयनाथ कुंजरू यांच्या सहयोगाने इलाहाबाद येथे "बालचर सेवा समिती" चा श्रीगणेशा केला.

भारतातील स्काऊट आणि गाईड चळवळीची ठळक वैशिष्ट्ये


१९०९ :-     कॅप्टन टी. एच. बेकर यांनी बॉय स्काऊट असोसिएशन ची स्थापना करून बेंगलोर येथे पहिले                         स्काऊट युनिट सुरू केले.


१९१० :-     कॅप्टन टी. टोड यांनी खडकी पुणे,मेजर डब्ल्यू.पी. पैकनहम वाल्स यांनी जबलपूर येथे स्काऊट दल                    सुरू केले. कर्नल जे. एस. विल्सन आणि सर एल्फेड पिकफोर्ड यांनी कलकत्ता येथे स्काऊट ची                        सुरुवात केली.


१९१३ :-     विवियन बोस यांनी भारतीय मुलांसाठी मध्य भारतात स्काऊटींग ची सुरुवात केली.


१९१५ :-     डॉ.एनी बेसेन्ट तसेच जी.एस. अरुणधडे यांनी मद्रास येथे "इंडियन बॉय स्काऊट असोसिएशन" ची                    स्थापना केली बंगालमध्ये भारतीय मुलांसाठी स्काऊटींग सुरू केले.


१९१८ :-     पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सूचनेवरून पंडित श्रीराम वाजपेयी यांनी पंडित हृदयनाथ कुंजरू                 यांच्या सहयोगाने इलाहाबाद येथे "बालचर सेवा समिती" चा श्रीगणेशा केला.


१९१९ :-     १ डिसेंबर १९१९ "सेवा समिती स्काऊट असोसिएशन" ची स्थापना इलाहाबाद मध्ये केली ज्याचे                     संरक्षक उत्तर प्रदेशचे गव्हर्नर यांना बनवले गेले


१९२१ :-     बी. पी. यांची भारतात पहिली भेट बी.पी. भारतात जिथे-जिथे गेले तिथे रॅली काढली गेली.                 इलाहाबाद, जबलपूर, लखनऊ, रांची, मद्रास येथे रॅली काढली गेली "दक्षिण भारतीय स्काऊट                            संघटन" आणि "इंडियन बॉय स्काऊट असोसिएशन" चे एकत्रीकरण केले गेले मात्र सेवा समिती                        स्काऊट असोसिएशन हे वेगळे राहिले


१९३७ :-     पहिली अखिल भारतीय स्काऊट जांबुरी दिल्ली येथे आयोजित केली गेली त्यात बी.पी. नां आमंत्रित                 केले गेले.


१९३८ :-     एकत्रीकरणाचा पुन्हा प्रयत्न केला गेला "बाय स्काऊट असोसिएशन" चे उर्वरित संघटन एकत्र झाले                    त्याचे नवे नाव "द हिंदुस्तान स्काऊट असोसिएशन" झाले.


१९४७ :-     स्काऊट आणि गाईड संघटनेला एकत्र करण्याचा प्रयत्न झाला.


१९४९ :-     ९ मे रोजी राष्ट्रपती भवनात सभा झाली त्या सभेमध्ये भारत स्काऊट्स आणि गाईड्स ध्वज स्वीकृत                 केला गेला.


१९५० :-     "बॉय स्काऊट्स असोसिएशन इंडिया", "द हिंदुस्तान स्काऊट असोसिएशन" तसेच इतर                                 असोसिएशनचे नवे नाव ७ नोव्हेंबर १९५० रोजी "भारत स्काऊट्स आणि गाईड्स" असे ठेवले गेले.


१९५१ :-     १५ ऑगस्ट १९५१ रोजी "गर्ल्स गाईड असोसिएशनचे" पूर्णपणे विलीनीकरण केले गेले भारतात एक                    मात्र अधिकृत संघटन "भारत स्काऊट्स आणि गाईड्स" कार्यरत झाले.

                त्याचे राष्ट्रीय कार्यालय

     लक्ष्मी मुजुमदार भवन,१६ महात्मा गांधी मार्ग इंद्रप्रस्थ एस्टेट नवी दिल्ली- ११०००२ येथे आहे.









शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

सत्कृत्य Good Turn

सत्कृत्य Good Turn (दररोज एक)


        दररोज एक तरी सत्कृत्य करणे व दैनंदिनी लिहिणे


            स्काऊट-गाईड शिक्षण समाजाभिमुख आहे. समाजाकडून आपण कांही चांगले शिकत असतो तर काही वेळा समाजाला आपली गरज असते. ही गरज समाजसेवा या रूपाने आपण पूर्ण करतो. " सेवेचे शिक्षण" म्हणजे केवळ तत्वे शिकविणे असे नाही तर इतराविषयी सदिच्छा बाळगण्याची वृत्ती निर्माण करणे व प्रत्यक्षात त्यांचा अविष्कार होय. हा अविष्कार म्हणजे सत्कृत्य.

            सत्कृत्य म्हणजे चांगले काम. विना मोबदला सेवा स्वरूपात केलेले काम म्हणजे सत्कृत्य. स्काऊट-गाईड म्हणून तुम्हाला रोज निदान एक तरी सत्कृत्य करावे लागेल. हे काम तुम्ही निरपेक्ष वृत्तीने केले पाहिजे. सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात एक तरी सत्कृत्य करावयाचे आहे याची आठवण ठेवावी. एखाद्या दिवशी सत्कृत्य
करावयाचे राहून गेले तर दुसऱ्या दिवशी दोन करावीत. मात्र एका दिवशी असे बंधन नाही. त्यापेक्षा अधिक कामे केली तर ' अधिकश्य अधिकम् फलम्।

            सत्कृत्य म्हणजे फार मोठे धाडसाचे काम नाही. तर अगदी साध्ये काम सुद्धा सत्कृत्य होईल.

उदा.      लहान मुले, आंधळे - अपंग म्हातारे यांना मदत करणे. 

             बस मध्ये आवश्यक त्यांना बसावयास जागा देणे. 

             तहानलेल्याला पाणी देणे. 

             रस्त्यात पडलेला दगड उचलणे. 
            
             कचरा कुंडीत टाकणे.
             
             इत्यादी. 

बुधवार, १७ जून, २०२०

स्कॉउट ध्येय, खुण, वंदन, हस्तांदोलन

स्काऊट चे ध्येय (Scout Motto)

             
" तयार रहा "

" सदैव तयार "

" Be Prepared "

        याकरिता शरीराने सुदृढ, मनाने जागरूक व नीतीने पवित्र राहून इतरांना सदैव सहाय्य करण्यास तयार राहण्याचा प्रयत्न करणे हा या ध्येयाचा आचरणातील महत्त्वाचा भाग आहे.

स्काऊट खूण (Scout Sign)

        उजवा हात कोपरात वाकवून खांद्यापर्यंत आडवा न्यावा. त्या हाताचा पंजा उभा समोर ठेवून अंगठा करंगळीच्या नखावर ठेवण्याचा आणि मधली तीन बोटे एकमेकांना लावून सरळ वर धरावयाची अशा पद्धतीने स्काऊट गाईड खुण करावी लागते.

मधली तीन बोटे स्काऊट गाईड वचनाच्या तीन भागांची आठवण करून देतात. सर्व बोटात करंगळी लहान असते व आंगठा मोठा असतो तेव्हा मनातील क्षुद्र व हलके विचार उच्च विचारांनी दाबून टाकणे असा या बोटांचा अर्थ होतो.
स्काऊट खूण केव्हा करतात
1) वचन विधीच्या वेळी वचन घेताना स्काऊट खून करतात.
2) इतर कोणी वचन घेत असतील किंवा वचनाचा पुनरुच्चार करताना.
3) स्काऊट अनोळखी स्काऊटना मी पण स्काऊट आहे हे दाखवून देण्यासाठी करतात.

स्काऊट वंदन (Scout Salute)

        स्काऊट प्रणाम करताना प्रथम चपळतेने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला सरळ येईल असा उचलतात तळहात पुढील बाजूस करून मधली तीन बोटे एकमेकांना लावून संपूर्ण पणे उभी धरतात स्काउट चिन्ह प्रमाणे करंगळी मिटून तिचा नखावर अंगठा ठेवतात पहिले बोट उजव्या भुवयीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करतील असे धरा व स्मित हास्य करून प्रणाम करतात प्रणाम झाल्यानंतर चलाखीने पुढून हात झटकन खाली आणतात

आपला आदर व्यक्त करण्याकरिता पुढील प्रसंगी स्काऊट वंदन करतात
1) ध्वजारोहण प्रसंगी.

2) राष्ट्रगीत गाण्याच्या वेळी.

3) राष्ट्रध्वजास भारत स्काऊट व गाईड संस्थेच्या ध्वजास व जागतिक ध्वजास.

4) रॅलीमध्ये ध्वज नेता असतील तेव्हा.

5) एकमेकांना भेटताना प्रणाम हा प्रथम पाहणाऱ्यांनी करावा मग त्याचा दर्जा (अधिकारी) काही असो.

6) जेव्हा ध्वज खाली उतरतात तेव्हा वंदन न करता सावधान स्थितीत राहावे.


स्काऊट हस्तांदोलन (Handshake)


           एखाद्याने स्काऊट म्हणून ओळख देण्याकरिता स्काऊट वंदन केले तर लगेच दुसरा स्काऊट वंदन करून त्याचा स्वीकार करतो व त्यांच्याशी डाव्या हाताने हस्तांदोलन करतो.

           हार्दिक मैत्रीचे द्योतक म्हणून डाव्या हाताने हस्तांदोलन करण्याची सर्व जगातील स्काऊट गाईडची प्रथा आहे.

           हस्तांदोलन डाव्या हाताने करण्याची पद्धत या चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांनी लष्करी नोकरी करत असताना दक्षिण आफ्रिकेतील "अशांती जमातीकडून" उचलली.

           अशांती जमातीचा राजा "प्रम्पेह" यांना बेडन पावेल भेटण्यास गेले केव्हा आदर व्यक्त करण्याकरिता बेडन पावेल यांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात समोर केला तेव्हा राजाने आपला डावा हात समोर करून बेडन पॉवेल यांना म्हणाला की "आमच्या जमातीत शुरातला शूर पुरुष त्याच्या मित्राची हस्तांदोलन करताना त्याच्या डाव्या हातातील ढाल खाली ठेवून त्या हाताने हस्तांदोलन करतो."