स्काऊट चे ध्येय (Scout Motto)
" सदैव तयार "
" Be Prepared "
आपला आदर व्यक्त करण्याकरिता पुढील प्रसंगी स्काऊट वंदन करतात
1) ध्वजारोहण प्रसंगी.
2) राष्ट्रगीत गाण्याच्या वेळी.
3) राष्ट्रध्वजास भारत स्काऊट व गाईड
संस्थेच्या ध्वजास व जागतिक ध्वजास.
4) रॅलीमध्ये ध्वज नेता असतील तेव्हा.
5) एकमेकांना भेटताना प्रणाम हा प्रथम
पाहणाऱ्यांनी करावा मग त्याचा दर्जा (अधिकारी) काही असो.
6) जेव्हा ध्वज खाली उतरतात तेव्हा वंदन न
करता सावधान स्थितीत राहावे.
स्काऊट हस्तांदोलन (Handshake)
एखाद्याने स्काऊट म्हणून ओळख देण्याकरिता स्काऊट वंदन केले तर लगेच दुसरा स्काऊट वंदन करून त्याचा स्वीकार करतो व त्यांच्याशी डाव्या हाताने हस्तांदोलन करतो.
हार्दिक मैत्रीचे द्योतक म्हणून डाव्या हाताने हस्तांदोलन करण्याची सर्व जगातील स्काऊट गाईडची प्रथा आहे.
हस्तांदोलन डाव्या हाताने करण्याची पद्धत या चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांनी लष्करी नोकरी करत असताना दक्षिण आफ्रिकेतील "अशांती जमातीकडून" उचलली.
अशांती जमातीचा राजा "प्रम्पेह" यांना बेडन पावेल भेटण्यास गेले केव्हा आदर व्यक्त करण्याकरिता बेडन पावेल यांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात समोर केला तेव्हा राजाने आपला डावा हात समोर करून बेडन पॉवेल यांना म्हणाला की "आमच्या जमातीत शुरातला शूर पुरुष त्याच्या मित्राची हस्तांदोलन करताना त्याच्या डाव्या हातातील ढाल खाली ठेवून त्या हाताने हस्तांदोलन करतो."
हस्तांदोलन केव्हा करतात ?
उत्तर द्याहटवा