मंगळवार, १६ जून, २०२०

प्रवेश अभ्यासक्रम

                स्काऊट अभ्यासक्रमातील प्रवेशचा अभ्यासक्रम हा स्काऊट शिक्षणातील पहिला टप्पा आहे.

                प्रवेश अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय  किमान १० वर्षे असणे  गरजेचे आहे. प्रवेश अभ्यासक्रमाचा कालावधी हा ३ महिन्यांचा आहे .  प्रवेश अभ्यासक्रमाची परीक्षा ही शालेय स्तरावर स्काऊट मास्टर घेतात. स्काउटमास्टरांनी अभ्यासक्रम पूर्ण होताच ८ दिवसांत वचन विधी घ्यावा आणि प्रवेश पदक समारंभ पूर्वक स्काऊटना प्रदान करावे.   

प्रवेश अभ्यासक्रमाचे ठळक मुद्दे – 

1 स्काऊट चळवळीचा मूळ इतिहास 

2 स्काऊटचे नियम 

3 स्काऊटचे वचन 

4 स्काऊटचे ध्येय ,खूण ,वंदन ,हस्तांदोलन

 5 सत्कृत्य 

6 स्काऊट गणवेश 

7 विविध ध्वज – राष्ट्रध्वज, जागतिक स्काऊट ध्वज, भारत स्काऊट आणि गाईड ध्वज

8 स्काऊट गाईड प्रार्थना

9 झंडा गीत 

10 राष्ट्रगीत 

11 युनिटच्या चार मेळाव्यांना उपस्थिती 

12 वचनविधी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्याला काही शंका असतील किंवा काही सूचना व काही सुचवायचे असल्यास comments मध्ये कळवा