गुरुवार, १४ मे, २०२०

स्काऊट आणि गाईड चळवळीचा इतिहास

स्काऊट आणि गाईड चळवळीचा इतिहास
लॉर्ड बेडन पावेल ऑफ गिलवेल 1857 ते 1941
स्काऊट चळवळीचे संस्थापक जगाचे मुख्य स्काऊट

स्काऊट इतिहास

स्काऊट चळवळीचे पूर्णपणे आकलन करायचे असेल तर स्काऊट चळवळीच्या संस्थापक यांच्या विषयी माहिती आपणास असणे आवश्यक आहे. मुलांविषयी ज्यांना जास्तीत जास्त आस्था व आवड होती अशी जगात जी काही माणसे होऊन गेली त्यापैकी स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल हे एक फार थोर मुलांचा माणूस म्हणून होऊन गेले. सर्व त्यांना बी. पी. या आवडत्या नावानेच ओळखत असत रॉबर्ट स्टीफन्सन स्माईथ बेडन पावेल हे त्यांचे पूर्ण नाव त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये लंडन या गावी 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. त्यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी भारतात सब लेफ्टनंट च्या हुद्यावर नोकरी करण्याची संधी मिळाली. नोकरीत अनेक शौर्य गाजवून बढती मिळत गेली, मेजर जनरल या वरच्या दर्जाच्या हुद्द्यावर जाऊन पोहोचले आणि जनतेच्या दृष्टीने ते एक मोठे वीरपुरुष ठरले.
दक्षिण आफ्रिकेतून 1901 मध्ये ते इंग्लंडमध्ये परत आले लष्करात असताना त्यांनी लिहिलेले एडस टू स्कॉऊटींग हे पुस्तक या वेळी इतके लोकप्रिय झाले की त्यानंतर आपल्या देशातील मुलांना उत्तम नागरिक बनण्यास मदत करण्याची फार मोठी संधी यात आहे याची जाणीव त्यांना झाली. त्यातून स्काऊट या चळवळीचा जन्म झाला त्यादृष्टीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि 1908 मध्ये स्काऊट चळवळ उदयास आली
बी.पी.च्या जीवनपट

                १८५७ – जन्म २२ फेब्रुवारी

            १८६९ – शालेय शिक्षण

            १८७६ - सैन्यात भरती

            १८७६ ते १८८४ – भारतात सैनिक अधिकारी म्हणून नियुक्ती

            १८८३ – कॅप्टन म्हणून नियुक्ती

            १८८८ - झुलू जमातीशी युद्ध

            १८९५ – अशांती जमातीशी युद्ध

            १८९६ – जनरल ऑफिसर कमांडिंग चीप स्टाप

            १८९९ – मेफाकिंगचा वेढा

            १९०१ – मेजर जनरल म्हणून नियुक्ती

            १९०७ – ब्राऊनशी बेटावर पहिला कॅम्प

            १९०८ – स्काउटिंग फॉर बॉईज पुस्तक निर्मीती

            १९१० – सैनिकी जीवनातून सेवा निवृत्ती

            १९१२ – विवाह झाला

            १९१९ – स्किम ऑफ ट्रेनिंग या पुस्तकाची निर्मीती

            १९२० – जगाचे मुख्य स्काउट म्हणून पदवी

            १९४१ – मृत्यू ८ जानेवारी १९४१ केनिया  



२ टिप्पण्या:

आपल्याला काही शंका असतील किंवा काही सूचना व काही सुचवायचे असल्यास comments मध्ये कळवा