रविवार, ३१ मे, २०२०

भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती

भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती

                    भारतीय नागरिक असलेल्या तसेच वय वर्ष दहा पूर्ण व सतरा वर्षाच्या आत असलेल्या मुलास स्काऊट होता येते अशा इच्छुक स्काऊट मुलाने तीन महिन्याच्या आत प्रवेश अभ्यासक्रम समाधानकारकरीत्या पूर्ण केला पाहिजे प्रवेश अभ्यासक्रमात भारत स्काऊट गाईड संस्थेचे स्वरूप ध्येय तत्व व कार्यपद्धत इत्यादी माहिती स्काऊटला असली पाहिजे.

चळवळीचे स्वरूप
    - भारत स्काऊटस् आणि गाईडस्.
    व्याख्या -
स्काऊटस् आणि गाईडस् चळवळ ही अराजकीय, शैक्षणिक, निधर्मी, सर्वधर्म समभावाची भावना जोपासणारी गणवेश धारी तरुणाची जागतिक व आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांनी सन 1907 मध्ये सांगितलेला हेतू, तत्व, कार्यपद्धतीनुसार या चळवळीचे कार्य चालते.

चळवळीचा उद्देश
     शीलसंवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा ही स्काऊट गाईड चळवळीची चतु:सूत्री आहे. तरुण मुलांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक व भावनिक विकास करून त्यांना या देशाचे जबाबदार नागरिक बनविणे हा या चळवळीचा उद्देश आहे
.
चळवळीचे तत्व
            स्काऊट गाईड ही चळवळ खालील तीन तत्त्वावर आधारित आहे

i) परमेश्वरा प्रती कर्तव्य :- प्रत्येकाने धार्मिक तत्वांप्रति निष्ठा ठेवणे, धर्माप्रती निष्ठा व्यक्त करणे तसेच ईश्वराप्रती कर्तव्याचे पालन करावे. ( टीप इच्छा असल्यास ईश्वर ऐवजी धर्म हा शब्द वापरता येईल)
ii) इतरा प्रति कर्तव्य :- आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाचे देणे लागते याबाबत जाणीव निर्माण करून समाजाच्या विकासात्मक कार्यात सहभाग घेणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी कार्य करणे.
iii) स्वतः प्रति कर्तव्य :- स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील असावे व स्वतःच्या अंगी विविध कला, कौशल्य, नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.

चळवळीची कार्यपद्धती
        स्काऊट गाईड चळवळीत प्रगतीसाठी व शिक्षणासाठी खालील कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो.
 i)     वचन व नियम.
 ii)     करता करता शिकणे.
iii)     प्रौढांच्या मार्गदर्शनाने संघ पद्धतीनुसार आपली जबाबदारी स्वीकारणे आणि प्रशिक्षणाद्वारे नेतृत्व गुणांचा विकास व क्षमता संपादन करणे.
iv)     मुलांच्या आवडीनुसार खेळ कौशल्य व समाजसेवा या उपक्रमाच्या माध्यमाने प्रगती पर्व प्रेरणादायी अशा कार्यक्रमाची निवड करणे तसेच निसर्ग भ्रमणाचे व अभ्यासाचे कार्यक्रम योजने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्याला काही शंका असतील किंवा काही सूचना व काही सुचवायचे असल्यास comments मध्ये कळवा