रविवार, ३१ मे, २०२०

Scout Books APRO

Scout Books
स्कॉउट आणि गाईड शिक्षणासाठी पुस्तकांचे खूप महत्त्व आहे  आज आपल्याला बरेचसे पुस्तक उपलब्ध होत नाहीत त्यासाठी माझ्या स्काऊट आणि गाईड बंधू व भगिनी साठी सर्व प्रथम APRO I, APRO II, APRO III तीन महत्त्वाची पुस्तके Pdf स्वरुपात  आपल्या साठी उपलब्ध आहेत.  
APRO - म्हणजे काय ?
A - AIMS  ( उद्देश )
P - POLICY  ( नीति )
R - RULES  ( नियम )
O - ORGANISATION  ( संगठन )

APRO - I
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


APRO -II
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


APRO -III
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती

भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती

                    भारतीय नागरिक असलेल्या तसेच वय वर्ष दहा पूर्ण व सतरा वर्षाच्या आत असलेल्या मुलास स्काऊट होता येते अशा इच्छुक स्काऊट मुलाने तीन महिन्याच्या आत प्रवेश अभ्यासक्रम समाधानकारकरीत्या पूर्ण केला पाहिजे प्रवेश अभ्यासक्रमात भारत स्काऊट गाईड संस्थेचे स्वरूप ध्येय तत्व व कार्यपद्धत इत्यादी माहिती स्काऊटला असली पाहिजे.

चळवळीचे स्वरूप
    - भारत स्काऊटस् आणि गाईडस्.
    व्याख्या -
स्काऊटस् आणि गाईडस् चळवळ ही अराजकीय, शैक्षणिक, निधर्मी, सर्वधर्म समभावाची भावना जोपासणारी गणवेश धारी तरुणाची जागतिक व आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांनी सन 1907 मध्ये सांगितलेला हेतू, तत्व, कार्यपद्धतीनुसार या चळवळीचे कार्य चालते.

चळवळीचा उद्देश
     शीलसंवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा ही स्काऊट गाईड चळवळीची चतु:सूत्री आहे. तरुण मुलांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक व भावनिक विकास करून त्यांना या देशाचे जबाबदार नागरिक बनविणे हा या चळवळीचा उद्देश आहे
.
चळवळीचे तत्व
            स्काऊट गाईड ही चळवळ खालील तीन तत्त्वावर आधारित आहे

i) परमेश्वरा प्रती कर्तव्य :- प्रत्येकाने धार्मिक तत्वांप्रति निष्ठा ठेवणे, धर्माप्रती निष्ठा व्यक्त करणे तसेच ईश्वराप्रती कर्तव्याचे पालन करावे. ( टीप इच्छा असल्यास ईश्वर ऐवजी धर्म हा शब्द वापरता येईल)
ii) इतरा प्रति कर्तव्य :- आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाचे देणे लागते याबाबत जाणीव निर्माण करून समाजाच्या विकासात्मक कार्यात सहभाग घेणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी कार्य करणे.
iii) स्वतः प्रति कर्तव्य :- स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील असावे व स्वतःच्या अंगी विविध कला, कौशल्य, नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.

चळवळीची कार्यपद्धती
        स्काऊट गाईड चळवळीत प्रगतीसाठी व शिक्षणासाठी खालील कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो.
 i)     वचन व नियम.
 ii)     करता करता शिकणे.
iii)     प्रौढांच्या मार्गदर्शनाने संघ पद्धतीनुसार आपली जबाबदारी स्वीकारणे आणि प्रशिक्षणाद्वारे नेतृत्व गुणांचा विकास व क्षमता संपादन करणे.
iv)     मुलांच्या आवडीनुसार खेळ कौशल्य व समाजसेवा या उपक्रमाच्या माध्यमाने प्रगती पर्व प्रेरणादायी अशा कार्यक्रमाची निवड करणे तसेच निसर्ग भ्रमणाचे व अभ्यासाचे कार्यक्रम योजने.

स्काउट आणि गाईड चे वचन (Promise) व नियम (Law)

स्काउट आणि गाईड चे वचन (Promise) व नियम (Law)
स्काउट वचन 
"मी माझ्या शीलास स्मरून असे वचन देतो की,
ईश्वर (धर्म) आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य 
करण्याचा. इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि स्काउटचे
नियम आचरणार आणण्याचा प्रयत्न करीन."


मैंं मार्यादापूर्वक प्रतिज्ञा करता हूँँ कि मैंं यथाशक्ती 
ईश्वर (धर्म ) और अपने देश के प्रति अपने कर्तव्य का पालन करूँँगा,
दुसरो की सहायता करूँँगा और
स्काउट नियम का पालन करूँँगा |


"On my honour, I promise that I will do my best
To do my duty to God (Dharma) and my Country,
To help other people and 
To obey the Scout Law.


स्काउट नियम 

१. स्काउट विश्वसनीय असतो.
२. स्काउट निष्ठावान असतो.
३. स्काउट सर्वांच्या मित्र असतो आणि इतर स्काउटचा बंधू असतो.
४. स्काउट विनयशील असतो. 
५. स्काउट प्राणीमात्रांचा  मित्र असतो व निसर्गावर प्रेम करतो.
६. स्काउट शिस्तप्रिय असतो व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यास मदत करतो.
७. स्काउट धैर्यवान असतो.
८. स्काउट काटकसरी असतो.
९. स्काउटचे विचार, उच्चार आणि आचार पवित्र असतात.



१.  स्काउट विश्वसनीय होता है |
२. स्काउट वफादार होता है|
३. स्काउट सबका मित्र और दूसरे स्काउट का भाई होता है|
४. स्काउट विनम्र होता है|
५. स्काउट पशु-पक्षीयोंं का मित्र और प्रकृति-प्रेमी होता है|
६. स्काउट अनुशासनशील होता है और सार्वजनिक संपत्ती की रक्षा करने में सहायता करता है|
७. स्काउट साहसी होता है|
८. स्काउट मितव्ययी होता है |
९. स्काउट मन, वचन और कर्म से शुद्ध होता है |


1. A Scout is Trustworthy.
2. A Scout is Loyal.
3. A Scout is a Friend to all and a brother to every other Scout.
4. A Scout is  courteous.
5. A Scout is a friend to animal and loves nature.
6. A Scout is disciplined and helps protect public property.
7. A Scout is courageous.
8. A Scout is thrifty.
9. A Scout is pure in thought, word and deed.

गुरुवार, १४ मे, २०२०

स्काऊट आणि गाईड चळवळीचा इतिहास

स्काऊट आणि गाईड चळवळीचा इतिहास
लॉर्ड बेडन पावेल ऑफ गिलवेल 1857 ते 1941
स्काऊट चळवळीचे संस्थापक जगाचे मुख्य स्काऊट

स्काऊट इतिहास

स्काऊट चळवळीचे पूर्णपणे आकलन करायचे असेल तर स्काऊट चळवळीच्या संस्थापक यांच्या विषयी माहिती आपणास असणे आवश्यक आहे. मुलांविषयी ज्यांना जास्तीत जास्त आस्था व आवड होती अशी जगात जी काही माणसे होऊन गेली त्यापैकी स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल हे एक फार थोर मुलांचा माणूस म्हणून होऊन गेले. सर्व त्यांना बी. पी. या आवडत्या नावानेच ओळखत असत रॉबर्ट स्टीफन्सन स्माईथ बेडन पावेल हे त्यांचे पूर्ण नाव त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये लंडन या गावी 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. त्यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी भारतात सब लेफ्टनंट च्या हुद्यावर नोकरी करण्याची संधी मिळाली. नोकरीत अनेक शौर्य गाजवून बढती मिळत गेली, मेजर जनरल या वरच्या दर्जाच्या हुद्द्यावर जाऊन पोहोचले आणि जनतेच्या दृष्टीने ते एक मोठे वीरपुरुष ठरले.
दक्षिण आफ्रिकेतून 1901 मध्ये ते इंग्लंडमध्ये परत आले लष्करात असताना त्यांनी लिहिलेले एडस टू स्कॉऊटींग हे पुस्तक या वेळी इतके लोकप्रिय झाले की त्यानंतर आपल्या देशातील मुलांना उत्तम नागरिक बनण्यास मदत करण्याची फार मोठी संधी यात आहे याची जाणीव त्यांना झाली. त्यातून स्काऊट या चळवळीचा जन्म झाला त्यादृष्टीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि 1908 मध्ये स्काऊट चळवळ उदयास आली
बी.पी.च्या जीवनपट

                १८५७ – जन्म २२ फेब्रुवारी

            १८६९ – शालेय शिक्षण

            १८७६ - सैन्यात भरती

            १८७६ ते १८८४ – भारतात सैनिक अधिकारी म्हणून नियुक्ती

            १८८३ – कॅप्टन म्हणून नियुक्ती

            १८८८ - झुलू जमातीशी युद्ध

            १८९५ – अशांती जमातीशी युद्ध

            १८९६ – जनरल ऑफिसर कमांडिंग चीप स्टाप

            १८९९ – मेफाकिंगचा वेढा

            १९०१ – मेजर जनरल म्हणून नियुक्ती

            १९०७ – ब्राऊनशी बेटावर पहिला कॅम्प

            १९०८ – स्काउटिंग फॉर बॉईज पुस्तक निर्मीती

            १९१० – सैनिकी जीवनातून सेवा निवृत्ती

            १९१२ – विवाह झाला

            १९१९ – स्किम ऑफ ट्रेनिंग या पुस्तकाची निर्मीती

            १९२० – जगाचे मुख्य स्काउट म्हणून पदवी

            १९४१ – मृत्यू ८ जानेवारी १९४१ केनिया